मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते
कुठेतरी मी उभा होतो..कुठेतरी दैव नेत होते
जरी जीवाला नको नकोशी ; ह्यात हसून काढली मी
निदान जे दु:ख सोसले ; ते सुखात होते..मजेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे .....
बघून रस्त्यावरील गर्दी ; कशास मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे..पडून माझेच प्रेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे .....
Author Unknown..