« on: July 05, 2010, 04:42:49 PM »
फुलपाखरे इवली इवली
रंग तयांचे कितीक छान
निळे जांभळे पिवळे काळे
मिशी तयांना नाजूक छान
आकाशातही रंग बहरती
निळ्या मखमली अंगावरती
पानफुलांमध्ये डुलती हसती
लाल गुलाबी ठिपके वरती कविता बोडस
« Last Edit: July 05, 2010, 04:46:22 PM by kavitabodas »

Logged