मस्त पाउस पडला दोन दिवस, नुसता रपरप कोसळला बाबा. स्वतःचा importance जपतो नाही का? एक तर वाट बघायला लावतो. नाही तर पडून गेल्यावर जागोजागी त्याच्या खुणा. बाहेर पडलो कि खड्ड्यांमधून रस्ता शोधत शोधत जा. एक तर आपल्याकडे सगळेच कसे वेळेत. एवढा धो धो पाउस, गाडी चालवताना त्र्राफ्फिक जाम, आणि त्यात सिग्नल च्या ठिकाणी फावडे-घमेले घेवून काही लोक ऐन वेळी खड्डे भारतायेत. छान दृश्य आहे कि नाही पावसातले! मस्त वाटले. तुम्हाला कशी दृश्य दिसली?
बरे ते जाऊ दे,बाकी पावसाने वातावरण अगदीच छान झालेय. सगळीकडे हिरवेगार वाटतेय.
.