सप्रेम नमस्कार,
हे निमंत्रण फॉरवर्ड करा आणि पुढील माहिती जास्तीत जास्त लोकांना द्या . (कार्यक्रम पत्रिकेसाठी Attachment बघा)
' सुहास शिरवळकर असे आणि तसे '
संपादक :अनिल किणीकर
प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन
प्रकाशन हस्ते : द.मा. मिरासदार , ह्. मो. मराठे
७ फेब्रुवारी २०१० (रविवार) , सायं ६ वा. पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे.
ग्रंथात, चित्रपट, कला , माध्यम, साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. चाहते , कुटुंबीय यांनी
शिरवळकरांवर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण लेख आणि आठवणी लिहल्या आहेत.
प्रकाशनाच्या दिवशी आपल्या आवडत्या सु.शि. यांच्या शशिदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांवर ४०% सुट दिली जाणार आहे .
सर्वांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण .
आपले
सुगंधा सुहास शिरवळकर,
सम्राट आणि प्रबोध शिरवळकर .
मनोज जोशी.
नमस्कार, मी मनोज
या पुस्तका मधे माझा "दुनियादारी" या अविस्मरणीय कादंबरी वर लिहिलेला लेख प्रकाशित आहे..
तेव्हा मला विशेष आनंद आहे.