« on: February 09, 2010, 10:38:21 AM »
च्यालेंज अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा ?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी ?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा
« Last Edit: February 09, 2010, 10:39:40 AM by gaurig »

Logged