अजूनही आठवते, मी इयत्ता सहावीत असताना माझी पहिली कविता "फुलपाखरू", विज्ञानाच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहिली होती.घरी ती आईने पहिली...तिला खूपच आनंद झाला कि मी कविता रचू शकते......खरे तर हा वारसा मला माझ्या वडिलांकडूनच मिळाला आहे...ते खूप सुंदर कविता रचत... पण आश्चर्य म्हणजे मी जेव्हा माझी पहिली कविता रचली त्यावेळी पप्पा कविता करतात हे माहितही नव्हते....